सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी केली जात असताना भोर शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त अन्नदन श्रेष्ठदान समजून अन्नदानाचा एक अनोखा उपक्रम राबविला.यावेळी शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद देऊन अन्नदान केले.
मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर जाऊन सामूहिक नमाज पठण केले आहे.त्यानंतर मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत ईद साजरी केली.रमजान ईदचे औचित्य साधून भोरमधील मुस्लिम तरुणांनी मुलांच्या एका दिवसाचा जेवणाचा खर्च उचलला.यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अहमद खान, कदीर खान ,तोशिब अत्तार, ताबिराज खान, इम्रान अत्तार, वाहिद शेख, साहिल खान, मोईज शेख, साजिद खान उपस्थित होते.