Khandala News l तीन पिकअप व्हॅन भरून तब्बल १८३ डुकरांची चोरी : शिरवळ पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकत १७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
पळशी ता. खंडाळा येथे खाजगी मालकीची तब्बल १८३ डुकरांची चोरी केल्या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील तीन आरोपी यांचे पैकी काहींवर मोका, दरोडा, जबरी चोरी, जीवे मारणेचा प्रयत्न, आत्महत्या करणेस भाग पाडणे असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक आरोपी हा खडक पोलीस ठाणे जि. पुणे येथे दाखल असलेला आत्महत्या करणेस भाग पाडणे या गंभीर गुन्हयात पाहिजे असलेला, असे आरोपी जेरबंद करणेत आलेले आहेत.
        या गुन्हया बाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ०३ मार्च २०२५ रोजीचे रात्री १ वाजलेपासून पहाटे ३.३० वाजताचे सुमारास पळशी, ता. खंडाळा, जि. सातारा गावच्या हद्दीत फिर्यादी दत्तात्रय माने रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा यांचे मालकीचे असणारे लहान-मोठे एकुन १८३ वराह (डुक्करे) दि. ०३ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी ३ पिकअप व्हॅनमधुन चोरी करुन नेले त्यावेळी तेथे राखणाकरीता असलेले दोन साक्षीदार यांना मारहाण दमदाटी केली. दाखल तकारी नंतर यातील आरोपी १) प्रकाश अशोक जाधव, वय ३१ वर्षे२) मयुर अशोक जाधव, वय २१ वर्षे३) सोन्या उर्फ विकास संजय पवार, वय २९ वय वर्षे ४) सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव, वय ४० वर्षे यांना दि. ०७ मार्च २०२५ रोजी अटक करणेत आली आहे. तसेच दि. १९ मार्च २०२५ तसेच दि. २१ मार्च २०२५ रोजीचे दरम्यान यातील आरोपी ५) सुनिल वसंत जाधव, वय २७ वर्षे, ६) पांडुरंग शिवाजी शिंदे, वय ३३ वर्षे, ७) किरणपानसिंग शितलसिंग दुधाणी, वय ३७ वर्षे, ८) ओमकार संतोष जाधव वय २४ वर्षे यांना अटक केले आहे. त्यांचे कडुन गुन्हा करते वेळी वापरलेली ३ पिकअप व्हॅन एकुन किंमत रुपये १७ लाख जप्त करणेत आलेल्या आहेत.
To Top