सुखद बातमी...l दिपक जाधव l बारामती तालुक्याचा 'जिरायती' शब्द पुसला जाण्याच्या हालचालींना वेग : पाठबंधारे विभागाकडुन सुमारे ३० कोटींची निविदा सादर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील ३३ गावांचा जिरायती शिक्का कायमचा पुसला जाण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या दरम्यान जिरायती शब्द पुसला जाणार हा दिलेला वादा आता पुर्ण होणार आहे. 
              नीरा-कऱ्हा उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी या योजनेचे सर्वेक्षण, संकल्पन व प्रकल्प अहवाल तयार करणे व इतर अनुषंगीक कामे करण्यासाठी पुणे येथील कार्यकारी अभियंता आणि पुणे पाटबंधारे विभाग यांनी सुमारे २९ कोटी ६४ लाख ६४४ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदेचा कालावधी १७ मार्च ते २४ मार्च २०२५ आहे. त्यामुळे नीरा-कऱ्हा उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळणार आहे.
          जिरायती शिक्का पुसला जाणार बारामती तालुक्यातील ३३ गावांचा जिरायती शिक्का कायमचा पुसला जाण्यासाठी १ हजार २५ कोटी खर्चाची नीरा कऱ्हा उपसा जलसिंचन योजना राबवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी ऑगस्ट महिण्यात बोरकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिली होती. त्यानुसार मंगळवारी निविदा सादर झाल्याने हालचालींना वेग आला आहे. 
       कऱ्हा निऱा या उपसा जलसिंचन योजनेमुळे ४५ हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. यावर्षी वीर धरण दोनदा भरेल एवढे पाणी नदीद्वारे वाहून गेले आहे. हेच वाहून जाणारे पाणी तेलंगणाच्या धर्तीवर मोठे वीज पंप टाकून सात फुटी पाइपलाइनद्वारे दोन टप्प्यांत उचलणार आहे. त्यामुळे जिरायती भागाला पाणी मिळाल्यास शेती ओलिताखाली येऊन जिरायती शिक्का पुसला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
       बारामती तालुक्यातील ३३ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीरा-कहा उपसा सिंचन योजना तयार करण्यात येत आहे. मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, जळगाव क.प., अंजनगाव या नदीकाठचा भाग तसेच चौधरवाडी, वाकी पासून ढाकाळे, भिलारवाडी पर्यंतची गावे या निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पांतर्गत ओलिताखाली येणार असल्ताने जिरायती भागातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करीत आहे.
      दरम्यान बाबुर्डी येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बऱ्याच वर्षापासुनच प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच जिरायती भाग ओलीताखाली यावा यासाठी अनेक वर्षापासुन पाठपुरावा सुरु होता. त्यामुळे जिरायती शब्द पुसण्यामागे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खऱ्याअर्थाने आहेत. त्यांनी दिलेल्या शब्दाची पुर्तता सहा महिण्यात केली. त्यामुळे जिरायती भाग अजित पवारांच्या मागे कायम राहणार असल्याचे पोमणे यांनी सांगितले. 
           ................................
To Top