सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळाव्यात यासाठी सुपे येथील छत्रपती शिवाजी महाराज सोसायटीने पुढाकार घेवुन शुभारंभ करण्यात आला.
या संस्थेने सेंद्रिय खते व सीएससी सेंटर या नविन विभागाचे उद्घाटन सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी जगताप म्हणाले की, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. तर कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल हे पहाणे आवश्यक आहे. येथील शेतकऱ्यांना इतरत्र कोठे जावे लागु नये यासाठी संस्थेच्यावतीने एकाच छताखाली सेंद्रीय खते आणि ऑनलाइन सेंटर काढण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेने राबविला आहे.
याप्रसंगी पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक महेश चांदगुडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सुशांत जगताप, तुषार हिरवे, शौकत कोतवाल, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, हरिभाऊ भोंडवे, भगवान चांदगुडे, जालिंदर चांदगुडे, संपतराव जगताप, संजय दरेकर, विकास अधिकारी विक्रम चौगुले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव लक्ष्मण चव्हाण यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विजय चांदगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर संस्थेचे उपाध्यक्ष वाल्मिक चांदगुडे यांनी आभार मानले.
.........................................