सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह एका तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करवडी ता. कराड येथे घडली आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी गावासह पंचक्रोशीतील गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कराड तालुक्यातील करवडी गावात ही घटना घडली आहे. राजवर्धन किशोर पाटील (वय 22) आणि राजेंद्र दादा कोळेकर (मोरे) (वय 55) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.