Bhor News l प्रकाश बनकर ठरला 'जानाई केसरी'...बुलेटसह जिंकली रोख रक्कम : राज्यभरातून ४०० मल्लांची हजेरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोरला श्री जानाई देवी यात्रा आणि श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात ४०० हून अधिक मल्लांनी हजेरी लावली होती. यात प्रकाश बनकर या मल्लाने प्रथम क्रमांकाची कुस्ती चितपट केल्याने बनकर कुस्ती आखाड्याचा मानकरी ठरला. बनकर याला बुलेट व रोख रक्कम देऊन सन्मानित केले.
           शहराचे ग्रामदैवत श्री जानाई देवी व रामनवमीनिमित्त रविवार दि.६ रोजी जंगी कुस्त्यांचा आखाडा जोडण्यात आला होता.आखाड्याचे पूजन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.आखाड्यात १५० कुस्त्या जोडून लावण्यात आल्या होत्या तर इतर ५० कुस्त्या मल्लांना आखाड्यात फिरवून लावण्यात आल्या.पुणे जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्या पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो कुस्ती शौकिनांनी कुस्ती आखाड्यास रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली होती.द्वितीय क्रमांक वेताळ शेडगे (ग्रामस्थांकडून रोख रक्कम) तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत गणेश जगताप विजयी झाल्याने स्प्लेंडर गाडी व रोख रक्कम देण्यात आली.यावेळी युवानेते पृथ्वीराज थोपटे,अध्यक्ष सचिन तारू,उपाध्यक्ष आकाश सागळे,खजिनदार योगेश दळवी, पै.किरण कांबळे, गुलाब किवळे,गणेश पवार,गणेश कांबळे,अमित सुर्वे, मयूर भेलके ,दत्ता बांदल,तेजस घोडके,तुषार भोकरे,पिंटू ढवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
------------------
बैलगाडा शर्यती ३०८ बैलगाडे धावले
 श्री जानाई देवी यात्रा व रामनवमी निमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीमध्ये ३०८ बैलगाड्यांची नोंद झाली होती.या शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राची हारत (भिवंडी) यांच्या बैलगाड्याला माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून देण्यात आले.असे यात्रा कमिटी अध्यक्ष सचिन तारु यांनी सांगितले.
Tags
To Top