वेल्हे l मिनल कांबळे l राजगड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज : सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीपैकी ३४ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.राजगड तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत नुकतीच पंचायत समिती सभागृहात पार पडली,प्रांतधिकारी महेश हरिचंद्रे,तहसिलदार निवास ढाणे,नायब तहसिलदार अमर बनसोडे,तीर्थगिरी गोसवी, लिपिक गोपाळ गोडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी तेली ,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, खंडु गायकवाड, विलास पांगारे, आदीसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे 
सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते,
---------
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे

*सर्वसाधारण पुरुष*-
आंबेगाव बुद्रुक,करंजावणे,कानंद,कुरण खुर्द,केळद,कोंडगाव,कोलंबी,कोळवडी,घिसर टेकपोळे,निगडे बुद्रुक,निवी गेवंडे,पाल बुद्रुक,रांजणे,लव्ही बुद्रुक,लाशिरगाव,वडघर,
वरसगाव,वांगणी,वांगणीवाडी,वाजेघर बुद्रुक,वेल्हे बुद्रुक 

*सर्वसाधारण स्त्री* -
कोशिमघर,धानेप,अंत्रोली,कोदवडी,गिवशी,गुंजवणे,जाधववाडी,दापोडे,बालवड,माणगाव,मेरावणे,मोसे बुद्रुक,रुळे,वांजळे,विंझर,वेल्हे खुर्द,साखर,सोंडे माथना,सोंडे हिरोजी,हारपुड

*नागरिकाचा मागास प्रवर्ग पुरुष* -
चिरमोडी,मांगदरी,मेटपिलावरे,सोंडे सरपाले,हिरपोडी,खरीव,घोल,मार्गासनी
*नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री* -
कातवडी,कुरण बुद्रुक,बोरावळे,मालवली,शेनवड,साईव्ह बुद्रुक,सोंडे कार्ला,आंबेड,खामगाव,शिरकोली

*अनुसुचित जाती पुरुष* -
गोंडेखल,
*अनुसुचित जाती स्त्री* -
आंबवणे,पाबे,
*अनुसुचित जमाती पुरुष*-
ओसाडे
*अनुसुचित जमाती स्त्री* -
कादवे,निगडे मोसे,

To Top