सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
वारजे माळवाडीतील गोकुळनगर परिसरातील एका पत्र्याच्या घरात मंगळवारी ९ एप्रिल रात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजनाच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच वारजे, सिंहगड रोड आणि कोथरूड अग्निशमन केंद्राच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी होज लाईनच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.
आगीत गंभीर जखमी झालेले मोहन माणिक चव्हाण (वय ४३) आणि अतिश मोहन चव्हाण (वय २५) या दोघांना तातडीने अॅम्बुलन्सद्वारे ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.