सोमेश्वर रिपोर्टर टीम------
आळंदी : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी १९ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्या दिवशी नित्याची गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा होईल. रात्री आठनंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या वाटचालीत लोणंद आणि फलटण येथे प्रत्येकी एकच मुक्काम असणार आहे.
दि. २० जूनला सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दि. २० व २१ रोजी अशा दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवड दि.२२ व २३ जून, जेजुरी दि. २४, वाल्हे दि.२५ येथे मुक्काम करेल. नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रवेश करून पालखी लोणंद दि. २६ रोजी मुक्कामी पोहोचेल. तरडगाव दि. २७, फलटण दि. २८, बरड दि. २९, नातेपुते दि. ३० च्या मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस दि. १ जुलै रोजी मुक्कामी जाईल. वेळापूर दि. २ रोजी मुक्कामी जाईल. संत सोपानदेवांच्या बंधूभेटीनंतर सोहळा भंडीशेगाव दि. ३ रोजी मुक्कामी असेल. त्यानंतर सोहळा वाखरी दि. ४ रोजी मुक्काम करेल. पाच जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. सहा जुलैला आषाढी एकादशी आहे.