पुरंदर l नीरेच्या किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा : माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला प्रिंटर भेट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा येथील किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय २००९-१० सालातील अकरावी व बारावी कला शाखेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. 
            या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मालोजीराजे महाविद्यालय लोणंदचे प्राचार्य श्री. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.धुमाळ, तसेच प्रमुख मान्यवर म्हणून प्रा. तरंगे, प्रा. पवार, प्रा. अहिरेकर उपस्थित होते. निरा, गुळुंचे, राख, कर्नलवाडी, पाडेगाव, पिंपरे, जेऊर,मांडकी, निंबूत, गडदरवाडी, सातारा, पुणे, मुंबई आदी ठिकाणी असलेले मुले-मुली एकत्र करून गेले दोन महिने व्यवस्थित नियोजन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कॉलेजसाठी प्रिंटर भेट देण्यात आला. आज पर्यंत कॉलेज मधील हा पहिला सर्वात मोठा व आठवणीत राहिल असा स्नेहमेळावा झाला. प्रत्येकाला रिटर्न गिफ्टस सुद्धा पेरूचे झाड, एक कापडी बॅग व कॉफी कप ज्यामध्ये आपलं गेट टूगेदर असा लोगो देखील प्रिंट करून आठवणस्वरूपी भेट देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी रुपेश ढावरे, नितीन दगडे,विशाल डोइफोडे, सुजित शिंदे, नितीन गायकवाड, विराज तांबे, सागर भोसले, सुमित देवगुडे, अभिजित शिंदे, सचिन डोईफोडे, सुजित पालव, अभी शिंदे,स्नेहल फडतरे, गौरी निगडे, शर्वरी सोनवणे, निकिता राव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
               या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाविद्यालयासाठी नेहमी तत्पर राहून जे योगदान देता येईल ते करण्याचा प्रयत्न करू असेही आश्वासन विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले. प्रास्ताविक व स्वागत सुजित पालव यांनी केले,  सूत्रसंचालन स्नेहल फडतरे व नितीन दगडे यांनी केले. आभार सागर भोसले यांनी मानले.
To Top