Pachgani News l आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील हे सवंगड्यांचा ३३ वर्षांनी भरला स्नेहमेळावा : गुरुजनांचाही केला सन्मान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिलार : सचिन भिलारे
आपल्या शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३३ वर्षांनंतर केंद्र शाळा भिलार  १९९२ - १९९३ च्या सातवीच्या  विद्यार्थ्यांनी बालपणीच्या शाळेतील गमती एकत्र येत दिला उजाळा भिलार येथील आनंद ऍग्रो हॉटेल मध्ये तबल ३५विद्यार्थी एकत्र येत  सभागृहामध्ये १९९२ च्या सातवीचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ३३ वर्षांनंतर म्हणजे वयाच्या चाळीशीत मित्र-मैत्रिणींच्या भेटी झाल्या.  आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील हे सवंगडी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. 
           दरम्यान विद्यार्थीदशेतील परिस्थिती, प्रसंग आठवत एकमेकांना नव्याने ओळख करून द्यावी लागत होती. पती, पत्नी, मुलंबाळं, नोकरी, व्यवसाय आदी विषयांवर गप्पा रंगल्या होत्या. 
३३ वर्षानंतर प्रथमच एकमेकांना भेटत असलेल्या अन् चाळसी  ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अश्रूंना आवरता आले नाही. यावेळी स्नेहभोजन, गीत-गायन, नृत्य, संगीतखुर्ची गाण्यांच्या भेंड्या विविध कलागुणांना वाट मोकळी करून या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ भेटीचा आनंदोत्सव स्नेह मेळाव्यातून उत्साहात संपन्न झाला. 
याप्रसंगी तत्कालीन गुरुजनवर्ग श्री गणिताचे गुरुजी आत्माराम  भिलारे  ,नारायण भिलारे गुरुजी , नारायण कासुर्डे गुरुजी , श्रीरंग भिलारे गुरुजी  यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी गुरुजनांचा श्री फळ शाल देऊनसन्मान करण्यात आला. 
 लहान-लहान असलेली मुलं आज मोठी होऊन कर्तृत्ववान झाली, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं नाव कमावलेलं पाहून आंनद झाल्याची भावना देखील गुरुजनांनी व्यक्त केली.
मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक ३३वर्षांनंतर भेटले त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या, सर्वांना भेटून आनंद झाल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
 याप्रसंगी माजी विद्यार्थी सुधाकर  मानकुंबरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली सूत्रसंचलन  महेंद्र भिलारे यांनी केले तर सुभाष धनावडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी संजय भिलारे राजाराम बिरामणे, आनंद  गावडे, सुरेश मोरे , बिपीन भिलारे,सुनील गोळे, अर्जुन पारठे,सखाराम चोरमले,रवींद्र उंबरकर,प्रभाकर गोळे, वसंत भिलारे , गणेश घोणे,फैयाज मोमिन,गणेश घोणे, दीपक पवार, दीपक घोणे,सुरेंद्र वाडकर, संजय बाबर, संदीप विठ्ठल पवार ,शिवाजी धनावडे, साहेबराव  दानवले शैलेश मानकुंबरे मोहन वाडकर,सचिन आनंदा भिलारे ,सुधीर भिलारे,शारदा जाधव , सुनंदा जाधव , सुशीला वाडकर.  विद्या  शेडगे ,किरण राजपुरे,  सुनीता  ,वंदना गोळे,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान सर्वांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व भविष्यात एकमेकांना भेटत राहण्याचा संकल्प करून निरोप घेतला.
To Top