सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर संतोष म्हस्के
हुंडा आणि सासरच्यांकडून होणाऱ्या अत्याचारामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या वैष्णवी हगवणे- कस्पटे हीच्यावरील अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणार असून वैष्णवी हिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे मत भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आत्महत्याग्रस्त वैष्णवीच्या आई-वडिलांच्या वाकड कस्पटेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन व्यक्त केले.
तर थोपटे यांनी कस्पटे कुटुंबीयांच्या दुःखात सामील होत कुटुंबीयांचे सांत्वन केले. हुंडा ही समाजातील एक गंभीर कीड असून अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त वैष्णवीच्या सासरच्या दोशींवर कठोर कारवाई होईपर्यंत स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ठाम ग्वाही यावेळी माजी आमदार थोपटे यांनी कुटुंबीयांना दिली.यावेळी गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशी संचालक शिवाजी बुचडे,दादाराम मांडेकर,संदीप साठे,नेरे सरपंच सचिन जाधव, साहेबराव जाधव माजी सरपंच दत्तात्रय गाढवे माजी चेअरमन तुकाराम जाधव संभाजी जाधव उपसरपंच निलेश जाधव उपस्थित होते.