सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील 123 आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासींसाठी सप्टेंबर महिन्यात जातीचे दाखले काढण्यासंदर्भात मेळावा घेऊन १२७ जणांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. या सगळ्याचा पाठपुरावा करून मार्च महिन्यात पडताळणीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १३४ जणांची पडताळणी करून घेण्यात झाली. त्यानंतर जातीचे दाखले वाटप करण्याचा व जातीचे दाखले नव्याने काढण्यासाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 123 जणांना प्रांत अधिकारी महेश हरिश्चंद्रे , तहसीलदार निवास ढाणे यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले. व नवीन ५3 जणांचे जातीचे दाखले काढण्याचे फॉर्म भरून घेऊन पडताळणी करण्यात आले.
यावेळी प्रांत अधिकारी महेश हरिश्चंद्रे , तहसीलदार निवास ढाणे निवासी नायब तहसीलदार मयूर बनसोडे, तालुका कृषी अधिकारी सुनील इडोळे, आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे निरीक्षक अधिकारी संख्ये , सहायक गट विकास अधिकारी पल्लवी तेली , माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, ज्ञान प्रबोधिनी चे संचालक विकास कुलकर्णी आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था पुणे जिल्हाध्यक्ष सुनील कोळपे उपसरपंच संतोष डांगे प्रभाकर काटकर नाना पवार योगेश काटकर तलाठी मंडळ अधिकारी हे उपस्थित होते.