Baramati News l सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चटई व खाऊचे वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी
संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चटई तसेच फराळाचे साहित्य व पाणीच्या बाटल्यांचा वाटप करण्यात आले.
            काल दि. २७ रोजी संत सोपानकाका पालखी सोमेश्वरनगर या ठिकाणी मुक्कामी होती. तत्पूर्वी वाघळवाडी येथील मुक्काम उरकून काल सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात अश्व रिंगण पार पडले. यावेळी पुणे जिल्हा युवा मोर्च्याच्या उपाध्यक्षा शिवानी अजिंक्य चौधरी यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दोनशे चटई तसेच राजगिरा चिक्की व पाण्याच्या बाटल्यांचा वाटप करण्यात आले.  यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, चेतनकुमार सकुंडे, दिग्विजय काकडे, प्रदीप मांगडे, सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top