Phaltan News l साखरवाडीचा सुपुत्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
लावणी लोकधारेच्या रंगभूमीवर आवाजाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे सुधीर नेमाणे यांना यावर्षीचा
बालगंधर्व परिवार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
        महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आपल्या दमदार निवेदनकौशल्याने अविरत २४ वर्षे योगदान देणारे  सुधीर लक्ष्मण नेमाणे* यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २५ जून २०२५ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष आदरणीय ल मेघराज राजेभोसले, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

निवेदनकलेचा प्रेरणादायी प्रवास
“शो मस्ट गो ऑन” या तत्त्वाला आत्मसात करत २००१ पासून व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सुधीरजींनी आजवर ७०० हून अधिक “चौफुला” प्रयोग, आणि कोका कोला कंपनीच्या थम्सअप चौफुलाच्या प्रमोशनल शोमध्ये तब्बल ३०० प्रयोग यशस्वी केले. या प्रवासात त्यांना दिवंगत विनोदी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध निवेदक पराग चौधरी, सुशील थिगळे, गायक, संगीतकार, निवेदक चित्रसेन भंवर, विलास मडके, प्रमोद शेंडगे, सोमनाथ फाटके आणि अरुण गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

मंचावरून स्टुडिओपर्यंतचा प्रवास
निवेदनासोबतच मिमिक्री आणि गायनातही त्यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली आहे.
"चौफुला "
“नटरंगी नार”, “कारभारी दमान”
"रंगात रंगला महाराष्ट्र "
“गर्जा महाराष्ट्र”, “मदमस्त अप्सरा”, “तुमच्यासाठी काय पण” यांसारख्या अनेक लोकप्रिय लोकधाराच्या कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून योगदान दिले आहे.
To Top