सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
शेतीचा बांध कोरला म्हणून दोन दोन कुटुंबात काठी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण झाली. यामध्ये एका महिलेचा हात फॅक्चर झाला असून याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तानाजी गोविंद महानवर रा. जोगवडी ता.बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुलसुंबी बाबुलाल पटेल, राजु उर्फ महेबुब बाबुलाल पटेल, सलीम बाबुलाल पटेल, रफीक बाबुलाल पटेल, अमन लतिफ पटेल, करिष्मा महेबुब पटेल, आसिया सलीम पटेल व समीना रफिक पटेल सर्व रा.जोगवडी ता.बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ जुलै रोजी घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानवर हे त्याचे घराचे जवळ शेतजमीन गट नं. २५५ मध्ये झाडे लावण्यासाठी खड्डे खोदत असताना त्यांच्या शेतीचे बांधालगत असलेले शेजारी कुलसुंबी बाबुलाल पटेल येऊन महानवर यांना म्हणाली की, तु आमचा बांध का कोरला व बांधालगत खड्डे का घेतले असे म्हणुन शिविगाळ,दमदाटी करुन फिर्यादीला हाताने मारहाण केली त्यावेळी राजु उर्फ महेबुब बाबुलाल पटेल, सलीम बाबुलाल पटेल, रफीक बाबुलाल पटेल, अमन लतिफ पटेल, करिष्मा महेबुब पटेल,आसिया सलीम पटेल व समीना रफिक पटेल सर्व रा.जोगवडी ता.बारामती जि.पुणे हे आले त्यावेळी ते सर्वजण म्हणाले की,तुंम्ही आमचा बांध का कोरला,व आमचे बांधालगत खड्डे का घेतले असे म्हणून शिविगाळ करुन सलीम बाबुलाल पटेल याने त्याचे हातातील कु-हाड उलट्या बाजूने फिर्यादीचे डोक्यात मारुन दुखापत केली, तसेच राजु उर्फ महेबुब पटेल, रफीक पटेल, अमन पटेल यांनी काठीने महानवर यांच्या डाव्या हातावर, पाठीवर, दोन्ही पायावर मारहाण केली, तेथे भांडणे सोडविण्यासाठी महानवर आई नकुसाबाई, पत्नी सोनाली,भाउ सोमनाथ, मोहन,भावजय कलावती, मैना हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही वरील सर्वांनी मारहाण केली आहे. भांडणात महानवर यांची आई नकुसाबाई हिस उजवे हातावर सलीम पटेल याने कुऱ्हाडीचे दांडयाने मारहाण करुन फॅक्चर केले.