सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडीतील अस्मिता सतिश सावंत हिची
तीने ईडब्ल्यूएस मधुन देशात ५ वा क्रमांक मिळविला आहे. शेतकरी कुटुंबातील अस्मिता सावंत हीने बीएसी अग्रीकल्चर मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विवेकानंद अभ्यासिका या ठिकानी अभ्यास करताना विविध मार्गदर्शन मिळले . कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने तसेच वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अँड.हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे,सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळालेल्या यशाबद्दल सत्कार करून अभिनंदन केले.
--------------------------
आई-वडिलांचा पाठींबा होता.त्यांनी खूप कष्ट केले आहे.त्यांच्यामुळे हे होऊ शकल.शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती विषयी आवड आहे.विविध प्रयोग करत असायची.शिक्षण मराठी माध्यमातुन घेतले.अभ्यास करताना मेहनत घेतल्याने हे यश मिळू शकले.जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करू शकले.अजून पुढे जायचं आहे.
-अस्मिता सतिश सावंत