सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महुडे वरून भोरकडे येणारी एसटी बस प्रवाशांसह पावसामुळे साईड पट्टीवरून घसरून गटारात पलटी झाल्याची घटना बुधवार दि.९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात एक शाळकरी मुलगी जखमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
स्थानिकांनी दिलेले माहितीनुसार एसटीतून भोरबाजूकडे माळवाडीला जाण्यासाठी महुडे येथील शाळेतून सुटलेल्या ६ मुली प्रवास करीत होत्या.महूडे खुर्द आणि महूडे बुद्रुक येथील खुडेवस्ती जवळील विहिरीच्या चडाला अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देताना भोर आगाराची एमएच ०६ एस ८२८९ ही एसटी बस गटरात घसरून पलटी झाली.यावेळी बसमधील एक मुलगी जखमी झाली तर इतर पाच मुली तर बस चालक व वाहक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मागील वर्षीही पावसाळा सुरू झाल्यानंतर या अपघाताप्रमाणेच रस्ता अरुंद असल्याने एसटी बस पलटी झाली होती.यंदाही त्याच प्रकारचा अपघात झाला असल्याने शासनाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे अशी मागणी महुडे पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.घटनास्थळी भोर एसटी आगाराचे अधिकारी तात्काळ पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली.