Dam Update l भाटघर ७२ तर वीर @ ८५ टक्के : निरा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात दमदार पावसाने सुरुवात केल्याने राज्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 
        निरा खोऱ्यातील निरा-देवघर, भाटघर, वीर व गुंजवनी ह्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण ८७ टक्के भरल्यामुळे निरा उजव्या व निरा डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले असून वीर धरणामधून निरा नदीत आज सकाळी सहा वाजता ९ हजार ६९६ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 
        निरा धरण साखळीतील निरा देवघर, भाटघर, वीर व  गुंजवनी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. निरा देवघर धरणक्षेत्रात आजपर्यंत एकूण ९५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ५२.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 

भाटघर धरणक्षेत्रात ४२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ७२.२२ टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणक्षेत्रात १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात सद्या ८४.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गुंजवणी धारणक्षेत्रात १२३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ७३.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Tags
To Top