सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
पंढरपूर वरून देवदर्शन करून परतत असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयासमोर टँकरने पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात रविवारी (दि,६) सकाळी १० च्या सुमारास घडला यामध्ये मल्हारी बाजीराव पवार ( वय ५७,) यांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय,५० दोघेही, रा. येळपणे पोलीस वाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) असे या दाम्पत्यांचे नाव असून पवार दांपत्य हे पंढरपूर येथून देवदर्शन करून दुचाकीवरून (एम.एच.१६ ए.जी 2343) घराकडे परतत असताना एका अज्ञात टँकरने त्यांना धडक देऊन अपघात केला या नंतर ट्रॅकर चालक फरारी झाला पवार दांपत्य हे पंढरपूर वरून देवदर्शन करून एकादशी दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील अज्ञात टँकरचा शोध घेण्याचे काम भिगवण पोलीस करीत आहे.