पुरंदर l अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्ता भोंगळे तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी सुनील लोणकर यांची निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
पुरंदर : प्रतिनिधी
साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.दत्तात्रय भोंगळे तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मा.सुनील लोणकर यांची निवड करण्यात आली. दत्तात्रय भोंगळे यांनी गेली अनेक वर्षे साहित्य परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून उत्तम साहित्य सेवा बजावली आहे.
 तर  सुनील लोणकर यांनी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन व छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन उभारणीत या दोघांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
              सासवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार, कवी शरद पाडसे,उत्कृष्ट सूत्रसंचालक माऊली घारे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते हेमंत टिळेकर,पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप जगताप, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर, शिक्षक नेते प्रकाश जगताप, पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक मनोज सटाले, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र ताम्हाणे ,मुकेश घारे उपस्थित होते.
To Top