सुपे परगणा l महसुल विभागाचा सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न : अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
शासनाच्या महाराजस्व समाधान शिबिरातुन महसुल आणि इतर विभागाच्यावतीने समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली. या शिबीरात सुमारे बाराशे लाभार्थ्यांना लाभ मिळाला. 
            सुपे ( ता. बारामती ) येथे शासनाच्यावतीने महसुल विभागांतर्गत मंडलस्तरावर महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन बुधवारी ( दि.३० ) सकाळी दहा वाजता पुजा गार्डन कार्यालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन सुहास मापारी बोलत होते. 
      यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मापारी आणि प्रांतधिकारी वैभव नावडकर यांची बैलगाडीतुन वाजत गाजत मिरवणुक कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली होती. 
         मापारी म्हणाले की, वर्षातुन चार वेळा तालुकास्तरावर असे अभियान राबवले जाणार आहे. त्याची सुरुवात सुप्यापासुन करण्यात येत आहे. सुपे मंडलने शासनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांना सोबत घेवुन केल्याचे गौरद् गार  काढले. तसेच सुप्यात आधारकार्ड मशीन देण्यात आली आहे. त्यामुळे आधार बाबत ज्या दुरुस्ती असतील त्याची कामे तात्काळ होणार असल्याचे मापारी यांनी सांगितले. 
         तालुकास्तरावर सन १९३० पासुनच्या सुमारे २० लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरु आहे. हे काम पुर्ण झाल्यास जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या जनतेला ही कागदपत्रे उपलब्द होतील अशी माहिती मापारी यांनी दिली.
    सर्व सामान्य जनतेला रहिवाशी, अधिवास, जातीचे दाखले, केवायसी, समाजकल्याण व पुरवठा विभाग, आधार कार्ड अपडेट, पंचायत समितीअंतर्गत विकास योजना, तालुका कृषी योजना, महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विकास योजना, महावितरण आदी विविध योजनांचा सुमारे एक हजार १९० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
     याप्रसंगी विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक गट विकास अधिकारी नंदन जराडे, महावितरणचे शाखा अभियंता के. के. चव्हाण. जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सरपंच तुषार हिरवे, शंकर शेंडगे, सुशांत जगताप, बी. के. हिरवे, निता बारवकर, पोपट खैरे, विविध गावचे सरपंच नम्रता कुतवळ, निलिमा पानसरे, अशोक खैरे, बाळासाहेब गोसावी, सुनिल चौधरी आणि लाभार्थी उपस्थित होते. 
           यावेळी बैलजोडी मालक सुरेश चिपाडे, विठ्ठल चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मंडलाधिकारी एच. आर मनाले, ग्राम महसूल अधिकारी निलेश गद्रे, राहुल केंद्रे, आशुतोष पाटील, नीलम देखमुख, अनिता धापटे आदींचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसिलदार गणेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलम देशमुख यांनी केले. तर आभार मंडलाधिकारी एच. आर. मनाले यांनी मानले. 
     .................................................
To Top