Purandar Breaking l टँकर व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू : सासवड-नारायणपूर रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
सासवड-नारायणपूर मार्गावरील भिवडी गावच्या हद्दीत चौधरी वस्तीजवळ दुचाकी व डिझेल वाहक टँकर या दोन वांहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होवून दुचाकीवरील तरूण व पाठीमागे बसलेली तरूणी जागीच ठार झाले. धडक एवढी भिषण होती की दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली व दुचाकी चा चक्काचूर झाला. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला टँकर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार कापूरहोळ वरून सासवड बाजूकडे येणारा डिझेल टँकर क्रमांक एम एच १२ आर एन ६८४३ ने भिवडी गावाजवळ ओव्हरटेक करताना समोरून येणारी दुचाकी क्रमांक एम एच १२ एक्स व्ही ९४४२ ला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवर असणारे नंदू रत्नाकर होले (वय २२) रा.खानवडी ता.पुरंदर  व अपूर्वा रविंद्र कुंभारकर (वय २३) रा.कुंभारवळण ता.पुरंदर हे दोघेजण जागीच ठार झाले.मयतांचे ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.

सासवड पोलिसांत सुमीत रत्नाकर होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक हरीबा भिवा टोणे  (वय ४१वर्षे )रा.लोणी - काळभोर ता.हवेली याने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने निष्काळजीपणे रस्त्यांचे नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून दोघांचे मृत्युस व समोरील अॅक्टीवा गाडी टँकर चे नुकसानीस कारणीभूत ठरल्याने त्याच्या विरोधात फिर्याद दिली असून टँकर चालकाविरोधात सासवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
To Top