Baramati News l थोपटेवाडी ग्रामपंचायतीची डिजिटल झेप...! घरावर डिजिटल पाट्या करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक : प्रमोद पानसरे
डिजिटल इंडिया होत असताना अवघे दोन अडीच हजार लोकसंख्येची थोपटेवाडी देखील डिजिटल होत आहे.  आता येथील नागरिकांना  घराच्या दरवाजावर लावण्यात येणाऱ्या नावाच्या पाठीवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून मिळकतकर भरता येणार आहे.
         बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायत ने  तालुक्यात प्रथम हा प्रयोग राबवला आहे.
देशाच्या स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून 15  ऑगस्ट रोजी गावातील घरांवरील डिजिटल नावांच्या पाट्याचे वाटप करण्यात आली. आत्तापर्यंत नागरिकांना मिळकत कर भरण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जावं लागत होतं .
या यशस्वी प्रयोगामुळे आता कुठूनही ऑनलाईन पद्धतीने मिळकत कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच या क्यूआर कोड मधून घराचे क्षेत्रफळाची माहिती घराची रचना ही माहिती देखील घरबसल्या नागरिकांना मिळणार आहे.
"देशात डिजिटल इंडिया अंतर्गत यूपीआय पेमेंट चा वापर सर्वत्र होताना दिसत आहे. त्याचाच उपयोग ग्रामपंचायत कर प्रणाली मध्ये करून ग्रामपंचायतच्या कर उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याचे , तसेच यापुढे डीजीटायझेशन  चा वापर करून नागरिकांना अधिक अधिक सेवा ऑनलाइन देण्याचा मानस असल्याचे, तालुक्यात थोपटेवाडी ही पहिली  ग्रामपंचायत संपूर्ण पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बारामतीचे गटविकास अधिकारी. श्री. किशोर माने यांनी सांगितले,
ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, वर्षा सालगुडे म्हणाले की, आता नागरिक घरबसल्या कधीही कितीही टप्प्यात आपला मिळकत कर भरू शकतात... नागरिकांनी आर्थिक वर्षात सहा महिन्यापर्यंत चालू कर भरल्यास पाच टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल असे त्यांनी नमूद केले.
          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, सोमेश्वर चे संचालक सुनील भगत, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे, प्रताप धापटे, ग्रामपंचायत च्या सरपंच रेखा बनकर, उपसरपंच  शुभांगी अडागळे, ग्रामपंचायत सदस्य, कल्याण गावडे, राणी पानसरे, शिवाजी कोरडे, सीमा थोपटे, कमल थोपटे, पृथ्वीराज नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
To Top