Baramati News l गौरी सजावट स्पर्धा...आम्ही करणार तुमच्या सजावटीचं कौतुक : व्हिडिओ काढा...आणि आम्हाला पाठवा..! बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील महिलांसाठी गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरगुती गौरी-गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे.
          विजेत्या दहा महिलांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.  सजावट पर्यावरणपूरक असावी तसेच त्यातून सामाजिक संदेशही व्यक्त व्हावा, स्पर्धकांनी व्हिडिओसोबत आपले नाव, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व सजावटीची माहिती थोडक्यात नमूद करणे आवश्यक आहे. सर्व व्हिडिओ ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत ९८२२८४००८४ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले यांनी 
केले आहे.
         “गौरी-गणपतीच्या आरासीतून महिलांना सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळते. त्यातून पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक जाणही जपली जावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे.” गौरी-गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा महिलांसाठी एक वेगळी संधी ठरणार असून तालुक्यातील महिला उत्साहाने सहभाग नोंदवतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
To Top