सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
हिरडस मावळ ता.भोर खोऱ्यातील हिर्डोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी डॉ.अच्युत गावडे ,डॉ.अर्चना दरेकर तसेच नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना अज्ञात इसमांकडून खिडकीच्या काचा तोडल्याची घटना दि.१४ ऑगस्टच्या रात्री घडली.ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडा ओरडा करीत घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांना फोनद्वारे कळविले.परंतु ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचण्या अगोदरच अज्ञात इसमांनी तेथून पळ काढला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एक काळया किंवा निळसर रंगाची गाडी दवाखान्यासमोर उभी होती.चार ते पाच इसम त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी थांबले होते.त्यांनीच हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात आले.सदर घटने विषयी अज्ञात इसमां विरुद्ध भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राची तोड फोड करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याचा तपास करावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.तसेच सदर प्राथमिक आरोग्य केंद्र हिर्डोशी ता.भोर येथे सीसी टीव्हि बसविण्यात यावेत अशी मागणी हिरडस मावळातील नागरिकांकडून होत आहे.