सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
बारामती राशीन राज्यमार्गावर तक्रारवाडी गावच्या हद्दीत जयभवानी हॉटेल समोर मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीने दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .या अपघात १० वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात गणेश सुखदेव जाधव वय ३१ रा.शेटफळगढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे .तर ओम अशोक जाधव वय १० वर्ष राहणार तक्रारवाडी (भकासवाडी) हा मुलगा जखमी झाला आहे. राशीन बाजूकडील जयभवानी हॉटेल समोर मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी नंबर एम.एच,१२ व्ही .टी .९६४२ हिने हिरो कंपनीची दुचाकी नंबर एम.एच.४२ ए जे ७९५१ या गाडीस जोराची ठोकर दिल्याने सदर अपघात घडला.यात दुचाकी चालक गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला ओम जाधव जखमी झाला.भिगवण पोलिसांनी मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीवरील ड्रायव्हर सतीश शंकर धेंडे रा.काशेवाडी भवानी पेठ पुणे याच्याविरोधात त्याच्या ताब्यातील वाहनाने वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगात दुचाकीस ठोकर देवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश उगले आणि हवा.करचे करीत आहेत .
बारामती राशीन रोडवरील मदनवाडी चौक ते तक्रारवाडी गावाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम खात्याने एक किलोमीटर डिव्हायडर ला ६ ठिकाणी खुले ठेवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.गेल्या आठवड्यात अशाच अपघातात तक्रारवाडी गावातील नागरिकाने जीव गमविला असतानाच हा अपघात घडला आहे.हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायासाठी खुल्या केलेल्या डिव्हायडर मुले अपघात होत असताना याचे सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम खाते ,कंत्राटदार आणि सबंधित गावच्या सरपंच यांना नाही त्यामुळे निष्पाप नागरिक चिरडले जात आहे.याकडे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.