सुपे परगणा l दंडवाडी-जगतापवस्तीवर हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आणि कलशारोहण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील दंडवाडी अंतर्गत जगताप वस्तीवर हनुमान मंदिराचा जीर्णोदार करुन रविवारी ( दि. ३ ) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आणि कलसारोहण कार्यक्रम उत्साहात करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये सकाळपासुन होम हवन भजन कीर्तन आधी धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय होऊन गेले होते. 
         मुर्ती स्थापने दरम्यान शनिवारी सुप्यातून हनुमानाच्या प्रतिमेची तसेच कलसाची वाजत गाजत रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुप्यातील हनुमान मंदिरामध्ये महाआरतीचा कार्यक्रम करून मुख्यपेठेने बस स्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. 
         रविवारी सकाळपासून मंदिरात मोरगावचे पुरोहित किशोर वाघ यांनी मंदिरात मूर्तीचा दुग्धाभिषेक व होमहवनचा कार्यक्रम केला. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर सिद्धटेक येथील देवराम महाराज गायकवाड यांच्या हस्ते कलसारोहनाचा कार्यक्रम झाला. 
         यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले. त्यानंतर दुपारी दंडवाडी, खोपवाडी आणि सुपे येथील भजनी मंडळांकडुन भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. सायंकाळी सहाच्या दरम्यान हभप नवनाथ महाराज लिमन यांचे कीर्तन झाले. 
          जगतापवस्ती येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून १० फूट लांबी रुंदीचा मुर्ती स्थापनेचा गाभारा तसेच शिखराचे काम करण्यात आले आहे. या गाभाऱ्यात मूर्तीसाठी दगडी सिंहासन करण्यात आले आहे. तर गाभाऱ्यापासुन ३३ फूट लांब आणि २२ फूट रुंदीचा भव्य सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून १५ लाख खर्चाचा निधी देण्यात आला असल्याची माहिती बाजार समिती चे माजी सभापती संपतराव जगताप यांनी दिली.
     याप्रसंगी दंडवाडी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगताप, ज्येष्ठ नागरिक गोविंद जगताप, सामाजिक कार्यकर्ते पोपट जगताप, अविनाश खैरे, संतोष कोरडे, युवा उद्योजक प्रकाश जगताप, आरुषी उद्योग समूहाचे निलेश शिंदे, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, शरद पवार गटाचे सरचिटणीस सचिन जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
          ..........................
To Top