सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथे संत सेनामहाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील नाभिक संघटनेच्या वतीने श्री संत सेनामहाराज मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मंदिरात सकाळी सेना महाराजाच्या मुर्तीस अभिषेक, प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन आदी कार्यक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम होऊन सेना महाराजांच्या मुर्ती आणि प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हभप जयराम सुपेकर यांनी सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर निरुपम केले. दरम्यान भोंडवेवाडी येथील एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले, येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, ग्रा. पं. सदस्य विशाल चांदगुडे, भोंडवेवाडीचे राहुल भोंडवे, नामदेव भोंडवे, प्रकाश चांदगुडे, अशोक बसाळे, सूर्यकांत कुंभार, रामभाऊ काळखैरे, सुयश जाधव, महेश जाधव तर नाभिक समाजाचे जेष्ठ सदस्य भालचंद्र जाधव, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार दीपक जाधव यांनी मानले.
_____________________