सुपे परगणा l वढाणेतील स्मशानभूमी सुशोभीकरण अंतिम टप्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील वढाणे येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. 
       येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदच्या जनसुविधा योजनेतून ३० लाख खर्चाचा निधी देण्यात आला होता. त्यानुसार येथील १० गुंठे जागेत स्मशानभूमी, निवारा शेड, फेव्हर ब्लॉक आदी कामे करण्यात आली आहेत.
        या ठिकाणी ३५ बाय ६० फूट लांबी रुंदीचे निवारा शेड तयार करण्यात आले आहे. तर राहिलेल्या मोकळ्या जागेत फेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहे. येथील काम दर्जेदार झाले असून परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. येथे श्री महादेव मंदिर असल्याने परिसर सुशोभीत दिसून येत आहे. 
        राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून येथील विकास कामे सुरु असल्याची माहिती सरपंच सुनील चौधरी आणि वढाणे सोसायटीचे माजी अध्यक्ष रामभाऊ लकडे यांनी दिली.
       वढाणे ग्रामपंचायत सभागृह व गाळे ४० लाख, ओपन जिम ७ लाख, पद्मावती वस्ती ते खोर पूल ८० लाख, कौलेवाडी ते खोर पूल २० लाख, चिंचेचामळा रस्ता ९५ लाख, बिरोबा मंदिर रस्ता ५० लाख, गावठान अंतर्गत वेगवेगळे रस्ते १ कोटी, जिल्हा परिषद वर्ग खोली १२ लाख ५० हजार, लकडेवस्ती ते पाटीलवस्ती रस्ता ३५ लाख, कौलेवाडी बांधरा १५ लाख, लकडेवस्ती ते इनामवस्ती रस्ता १८ लाख, दशक्रिया निवारा शेड १० लाख, सार्वजनिक सौचालय ३ लाख, वर्ग खोली ४ लाख १२ हजार, जेजुरी रस्ता ५५ लाख, कौलेवाडी अंतर्गत सिमेंटीकरण रस्ता ४० लाख, जिल्हा परिषद शाळा रस्ता १० लाख, कौलेवाडी बंधारा, ओढा खोलीकरण १६ लाख आदी कामे जिल्हा परिषद फंड, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, समाजकल्याण, १५ वा वित्त आयोग आदी वेगवेगळ्या निधीतून कारण्यात आली आहेत. तर जिल्हा परिषद शाळा गावठान ३६ लाख, वढाणे खोर रस्ता १ कोटी ८० लाख, कौलेवाडी रस्ता १ कोटी ८० लाख, सौचालय ४ लाख, सभामंडप १५ लाख, तलाव भराव दुरुस्ती करणे आदी मंजूर कामांचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी एम. जी. गाडे यांनी दिली.     ............................................ 
To Top