सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
पानशेत वरसगाव धरण भागातील जलसंपदा विभागाच्या जागेत असणारी घरे अधिकृत होणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार संग्राम थोपटे म्हणाले की राजगड तालुक्यातील
पानशेत वरसगाव धरण भागातील जलसंपदा विभागाच्या जागेत असणारी घरे अधिकृत व्हावीत व सदर जागा ग्रामविकास विभागाकडे वर्ग करावी अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे कडे मागणी केली होती याबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी मापारी यांना या बाबत तात्काळ कारवाई करून सदर जागांची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
तसेच वांगणी खोरे,वाजेघर खोरे,शिवगंगा खोरे भागातील रखडल्या पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू करण्याबाबत या पाणी पुरवठा योजनांचे बाबत सुधारित एस्टिमेट सादर करून 15 सप्टेंबरच्या आत प्रशासकीय मान्यता देऊन काम चालू करण्याबाबत आदेश देण्यात आले. आणि गुंजवनी धरण पुनर्वसन संपादित जागेसाठी पुनर्वसन म्हणुन पुरंदर येथे जागा मिळण्याबाबत देखील मागणी केली होती याबाबत यावेळी पुरंदर येथे गायरान जमिनी मिळण्याबाबत माहिती घेऊन कारवाई करावी असे आदेश देण्यात आले.
यावेळी भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे समवेत धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, नाना राऊत, संदीप नगिने, राजू रेणूसे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, अमोल पडवळ, रमेश मारगळे, राजू कडू, तानाजी चोरगे उपस्थित होते.