सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव ता बारामती येथील नामांकित श्री मोरया विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुनील दत्तात्रय तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी संस्था म्हणून या सोसायटीची ओळख आहे.
मोरगाव येथील माजी सरपंच पोपट सर्जेराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली खेळीमेळीच्या वातावरणात आज ही निवडणूक पार पडली. सुमारे एक कोटी तीस लाख तीस लाख रुपये भाग भांडवल असलेल्या या संस्थेने नऊ कोटी सहा लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.
तालुक्याचे पश्चिम भागात सुमारे 1651 सभासद असून तब्बल 44 लाख रुपये गुंतवणूक आहे. आज झालेल्या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ अमर गायकवाड सह संस्था सूचिव सतीश नामदेव ढोले यांनी काम पाहिले.