Baramati News l सोमेश्वर देवस्थान येथे जुन्या बारवेचा जिर्णोद्धार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा : नवनाथ उद्योग समूहाकडून पूरग्रस्तांसाठी अडीच लाखांची मदत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे येथील जुन्या बारवेच्या जिर्णोध्दार केलेल्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 
        श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथील पुरातन बुजवलेल्या बारवेचे (विहिरीचे) जिर्णोध्दाराचे काम नवनाथ उदयोग समुहाचे संस्थापक तानाजीराव सोरटे व त्यांच्या कुटुंबियांनी स्वखर्चाने केलेल्या कामाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेशाने व सोमेश्वरावरील सोरटे कुटुंबियांच्या श्रध्देपोटी व राज्यातुन येणा-या भाविकांच्या सोयीसाठी लाखो रूपये खर्च करून या विहिरीचे जिर्णोध्दाराचे काम केले सोमेश्वर मंदिर परीसराला एक जुन्या पध्दतीचे घडीव दगडी बांधकाम तसेच त्यावर नक्षीकाम तसेच विहिरीच्या आतिल बाजुला बसवण्यात आलेल्या घडीव दगडी नक्षी खांबामुळे विहिरीला जुन्या पध्दतीचे गत वैभव प्राप्त झाले आहे. या विहिरीच्या बांधकामाच्या डिझायनचे काम पुणे येथील प्रसिध्द आर्किटेक्ट इंद्रजित कोठाडीया यांनी केले आहे. सोरटे कुंटुंबियांचे वतीने उपमुख्यमंत्राचा मंगल कलश शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. या वेळी नवनाथ अॅटोमोटीव्ह बारामतीचे प्रविण सोरटे, मगरवाडीचे माजी सरपंच अजित सोरटे व सायली ब्रिडर्सचे युवा उदयोजक देवेद्र सोरटे व इतर कुंटींबय उपस्थीत होते.
         तसेच नवनाथ उदयोग समुहामधील नवनाथ ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. करंजे यांचे वतीने मराठवाडयातील पूरग्रस्ताना मदत म्हणुन दोन लाख पन्नास हजारांचा धनादेश संस्थेचे चेअरमन तानाजीराव सोरटे यांच्या हस्ते व संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या उपस्तीतीमध्ये उपमुख्यमंत्रांकडे सुपुर्त केला. या कार्यक्रमाला सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ, बारामती तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधीकारी, अधिकारी तसेच मगरवाडी व करंजे गावचे सरपंच, उपसरपंच व त्यांचे ग्राम. सदस्य आणि सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधीकारी व परीसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.
To Top