Baramati News l किरण आळंदीकर यांची राज्यस्तरीय दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड : राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या समितीत कामाची संधी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या अखत्यारीत असलेल्या *महाराष्ट्र राज्य दक्षता समिती* मध्ये सोमेश्वरनगर परिसरातील के. एम. सराफ ज्वेलर्सचे मालक किरणशेठ आळंदीकर यांची निवड झाली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या गृह विभागाने काढला आहे. ही समिती राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्नांबाबत कार्यरत राहणार असून धोरण ठरवणार आहे.

करंजेपुल येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील किरण आळंदीकर हे कर्तृत्ववने इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बनले, राज्य सराफ फेडरेशन, बारामती सराफ असोसिएशन अशा संघटनावर कामाचा मोठा अनुभव आहे. ,सराफ, सुवर्णकार यांचे असंख्य प्रश्न सोडविले आहेत. आता अत्यंत मानाच्या अशा शासकीय समितीवर  निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 
 आळंदीकर म्हणाले, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या सहकार्याने आणि पोलिस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड होऊ शकली. त्या सर्वांचे आभार. परिसरातील लोकांनी प्रोत्साहन दिल्याने राज्यस्तरीय शासकीय समितीत पोचता आले.
To Top