भोर येथे आयोजित विज्ञान नाट्य स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी छत्रपती शिवाजी विद्यालय, भोरचे प्राचार्य अजय काळभोर म्हणाले, “शालेय जीवनात अभ्यासासोबतच क्रीडा व कलागुणांना प्राधान्य दिल्यास विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते. कलागुणांना वाव दिल्यास उज्ज्वल भविष्य घडते.”
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान नाट्य उत्सवांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन भोर कन्या प्रशालेत करण्यात आले होते. परीक्षक म्हणून राजेंद्र मोरे, ज्योती लिमन व मारुती मांढरे यांनी काम पाहिले. गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे व विस्तार अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे:
- प्रथम क्रमांक – छत्रपती शिवाजी हायस्कूल, भोर
- द्वितीय क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळू
- तृतीय क्रमांक – गर्ल्स हायस्कूल, भोर व आर.आर. विद्यालय
- उत्तेजनार्थ – विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, भोर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसगाव
एकूण सहा शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समिती भोर व भोर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राचार्य रेखा पाटील, वंदना कुंभार, ज्योती दीक्षित, कनिष्ठ अभियंता प्रवीण गायकवाड, विषयतज्ज्ञ सुनील गोरड, लता वाघोले, विजय जाधव, अर्जुन खोपडे, संतोष म्हस्के, शिला घोडके, मदनमोहन मिरजे, संतोष घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.