Bhor News l भोरच्या हिरडस मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक कार्यकर्त्यांचे इनकमिंग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शंकर मांडेकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या विकास कामांवर प्रभावित  हिरडस मावळ ता.भोर खोऱ्यातील काही ग्रामपंचायतच्या सरपंचांसह नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
           शिरवली हिमा,कुडली खुर्द,कुडली बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नामदेव दगडू पोळ यांच्यासह ग्रामस्थ कोंडीबा पोळ, हनुमंत पोळ, रघुनाथ कंक, बाळू कंक, विजय हनुमंत पोळ,नथुराम पोळ, दत्ता वेणूपुरे, प्रकाश पोळ, प्रभती पोळ, शंकर पोळ, दत्ता पोळ यांनी प्रवेश केला.यावेळी माजी उपसभापती सुनिल भेलके, भोलावडे  सरपंच प्रवीण जगदाळे,किवत सरपंच तानाजी चंदनशिव,शिंद माजी सरपंच रामदास भोंडवे,जेष्ठ मार्गदर्शक सुर्यकांत माने, आपटी उपसरपंच अविनाश गायकवाड, बबन ढवळे, कुडली माजी सरपंच बबनराव पोळ आदींसह हिरडस मावळातील सरपंच,उपसरपंच ग्रा.सदस्य तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मा.रणजित दादा शिवतरे यांनी पक्षप्रवेश केलेल्यांचे स्वागत करीत  पुढिल काळात राष्ट्रवादीकडून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
Tags
To Top