सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
चाळीस वर्षे सत्ता हातात असताना भोर, राजगड, मुळशीतील विकास कामे करू शकला नाही.जनतेने तुम्हाला नाकारले आहे.त्यातच उचलून आलेले असताना आमदार नाही. राज्यसभेवर, विधानसभेवर देखील नाहीत किंबहुना कुठल्या पक्षाचे प्रवक्ते नसताना महायुतीने आणलेल्या फुकटच्या विकास कामांचे श्रेय लाटू नका अशा शब्दात आमदार शंकर मांडेकर यांनी माजी आमदार यांच्यावर भोर येथील दुसऱ्या टप्प्यातील नवीन ५ एसटी बस (लालपरी) याच्या लोकार्पण करताना घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सडकून टीका करीत समाचार घेतला.
मांडेकर पुढे म्हणाले भोर विधानसभेत मागील सहा महिन्यांपासून महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला जात आहे.विकास कामांच्या निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो आणि तो पाठपुरावा आमदार या नात्याने आम्ही करून भोर विधानसभेच्या विकासासाठी निधी आणत आहोत.महायुती सरकार मधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भारघोष निधी भोरच्या विधानसभेच्या विकास कामांसाठी दिला जात असून भोरला दुसऱ्या टप्प्यातील ५ एसटी बसेस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.मात्र काँग्रेस पक्ष सोडून काल भाजपात आलेले आम्ही आणलेल्या विविध विकास कामांचे फुकटचे श्रेय घेत आहेत त्यांनी थांबावे.जनतेसमोर खोटे बोलून आम्ही आणलेल्या कामांचे श्रेय लाटू नये.तर भोर तालुक्याचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करू शकतो.त्यामुळे पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सध्या पक्षात अनेक जण प्रवेश करीत आहेत असे रणजीत शिवतरे म्हणाले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,चंद्रकांत बाठे,विक्रम खुटवड,नितीन थोपटे,यशवंत डाळ,महिलाध्यक्ष विद्या पांगारे,नीलम झांजले,विशाल कोंडे,विलास वरे,दत्ता मोरे,प्रवीण जगदाळे,गायकवाड,केदार देशपांडे,संदीप शेटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.