सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या काळात जबाबदारीने समाजाबरोबर राहून विकास कामांसोबत विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन राबविणे गरजेचे आहे.समाज हिताच्या उपक्रमासाठी तसेच विकासासाठी युवा वर्गाच्या कायम पाठीशी राहू. पृथ्वीराज भैय्या थोपटे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून भोर तालुक्यात निस्वार्थीपणे समाजसेवा करा असे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी फाउंडेशनच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी आनंदराव थोपटे महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन शासकीय नोकरी मिळवलेले तसेच महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष सन्मान करण्यात आले.माजी आमदार थोपटे पुढे म्हणाले तालुक्याची जनता गरीब असली तरी स्वाभिमानी आहे.तालुक्याचा गमावलेला मान,सन्मान,अभिमान पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. विकासाच्या संकल्पना पूर्णतः पूर्ण करण्याची जबाबदारी आहे ती पूर्ण करणार आहे.यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे,युवानेते पृथ्वीराज थोपटे,राजगड कारखाना उपाध्यक्ष पोपट सुके,भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,उद्योजक अनिल सावले, उत्तम थोपटे,हनुमंत कंक,रवींद्र कंक,पै.शिवाजी खोपडे,पै.जयवंत कोंढाळकर,संतोष धावले आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.