सुपे परगणा l शेतकऱ्यांची भुसंपदनाची रक्कम त्वरीत द्या : सुप्यातील संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांचा आक्रोश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या भुसंपदनात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची रक्कम त्वरीत मिळण्याची मागणी संवाद मेळाव्यात केली. 
        सुपे ( ता. बारामती ) येथील पुजा गार्डन मंगल कार्यालयात जनाईचे संबंधित अधिकारी आणि शेतकरी यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन यादव होते. यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जनाई योजना प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवराव, जनाई उपसा सिंचनचे व्यवस्थापक विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे उपस्थित होते. 
     यावेळी योजनेच्या कालव्यामध्ये जमिन गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच बंद पाईप लाईन कशाप्रकारे होणार आहे. ती बंद पाईप लाईन कशी असणार याची माहिती मिळावी. तसेच या योजनेचे हक्काचे पाणी अद्याप मिळत नाही ते मिळावे. तसेच या योजनेमध्ये समाविष्ट नसलेले तलाव समाविष्ट करून घ्यावेत आदी विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. 
        यावेळी संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तसेच अडचणी जाणून घेतल्या. तसेच काही मागण्या आहेत त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून त्याचे निराकारण करण्यात येईल असे सांगण्यात आले. 
        ..................................
To Top