Satara News l चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉड डोक्यात घालून पत्नीचा खून : पती पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खटाव : सतीश गायकवाड
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कटगुण, तालुका खटाव येथे गोसावी वस्ती परिसरात वास्तव्य असणाऱ्या पिंकी जाधव या वीस वर्षीय पत्नीचा पतीने लोखंडी रोड डोक्यात घालून केला. बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. खुनानंतर पती विनोद विजय जाधव याला पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
          याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कटगुण येथे महामार्गालगत गोसावी वस्ती असून तेथे वास्तव्य करणारे सर्वजण भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. या वस्तीमध्ये विनोद जाधव आणि पिंकी जाधव हे पती-पत्नी राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. बुधवारी सकाळी सर्वजण भंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यानंतर विनोद जाधव आणि पिंकी हिचे भांडण झाले. चारित्र्याच्या संशयावरून विनोद याने भंगारात पडलेला लोखंडी रोड पिंकीच्या डोक्यात घातला. हा घाव वर्मी लागल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर विनोद हा महामार्गालगत जाऊन बसला. पुसेगाव पोलिसांना घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. विनोद विजय जाधव याला खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.।
To Top