Someshwar Sugar Factory l ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव..! कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर : हुमणी नियंत्रण व व्यवस्थापनावर मार्गदर्शन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस पिकात वाढलेल्या हुमणी किडीचे नियंत्रण व व्यवस्थापन, शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या संदर्भात शिवार फेरीचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. करंजे गटातील चोपडज, वाकी, करंजेपुल, सस्तेवाडी या भागात कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवार फेरी पार पडली. शिवार फेरी दरम्यान ऊस पिकामध्ये हुमणी किडीमुळे होणारे नुकसान, त्यावरील उपाययोजना यावर सोमेश्वर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी  विराज निंबाळकर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने रोग-कीड नियंत्रणाची दिशा याबाबत कल्याणसिंग पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऋषिकेश गायकवाड यांनी  ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना आणि त्यांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घेण्याचे आवाहन केले.
           शिवार फेरीत चोपडज येथील पल्लवी सोपान जगताप यांच्या शेतात मोठ्या ऊसामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसला. करंजेपूल येथील अभिजीत हनुमंत गायकवाड आणि रामदास गेनबा गायकवाड यांच्या ऊसामध्ये कांडी किडीचा उद्रेक पहावयास मिळाला. वाकी येथील शेतकरी शिवाजी बाबुराव गाडेकर यांच्या शेतात कांडी कीड, लोकरी मावा प्रसरत असल्याचे दिसले. चंद्रकांत गाडेकर यांच्या ऊसात हुमणीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. नर्मदा गाडेकर यांच्या शेतात हुमणी अळीने प्रादुर्भाव झालेल्या ऊसपिकाची पाहणीकरून हुमणी अळी शोधण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच सचिन गाडेकर यांचे शेतावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे संयत्र पाहणी करून माहिती देण्यात आली. या शिवार फेरीस प्रगतशील शेतकरी प्रा. बाळासाहेब जगताप, सोपान  जगताप, उमेश गाडेकर, प्रमोद गाडेकर, अंकुश यादव, सुनील मोहिते, प्रल्हाद गाडेकर, सचिन पवार, गणेश पवार, सलीम शेख, रामदास साळुके, अनिल गाडेकर, धर्मराज विरकर,  रामदास जगताप, संतोष भोसले, रामचद्र घाडगे, ज्ञानेश्वर गाडेकर, सुधीर गाडेकर, निलेश गायकवाड, सतीश भानुदास गायकवाड, हरीश गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
                सस्तेवाडी येथेही शेतकऱ्यांना हुमणी किडे, कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात शेतीतील प्रयोग यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिवार फेरीस प्रगतशील शेतकरी किरण कदम,  सोमनाथ बेलपत्रे, सोमेश्वर शिंदे, मकरद सस्ते, सचिन सस्ते, दीपक सस्ते, जगन्नाथ सस्ते, बाळासो टकले, सिद्धार्थ टकले, स्वप्नील सस्ते, दीपक होळकर, अजय होळकर, अनिकेत कदम, दादा टकले, काका मगर उपस्थित होते. प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करून, ऊस उत्पादनात गुणवत्तावाढ व खर्चात बचत कशी साधता येईल यावर चर्चाही केली. शिवार फेरीसाठी अग्री ओव्हरसिअर रमेश शेटे आणि ऊस विकास विभागाचे प्रवीण निगडे यांनी परिश्रम घेतले.
To Top