Baramati Breaking l चारचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात सुपे येथील तरुणाचा मृत्यू : मोरगाव-सुपे रस्त्यावरील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सुपे - मोरगाव रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयानजीक शुक्रवारी ( दि. ०३ ) रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. 
        महेश दत्तात्रय बारवकर ( वय ३० रा. सुपे ता. बारामती ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
        स्थानिकाकडून मिळालेल्या माहिती नुसार, महेश बारवकर हे मोरगाव बाजूकडून मारूती कंपनीच्या ( एम एच ४२ बीजे ०३९७ ) इको कारने सुप्याकडे येत होते. यावेळी मोरगावकडे जाणाऱ्या १४ चाकी ट्रकच्या ( यु.पी. ७६ टी ०६९६ ) समोरासमोर झालेल्या अपघातात बारवकर गंभीर जखमी झाले. ही घटना माऊली मंगल कार्यालयानजीक शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. 
         या अपघातात त्याचा उजवा हात आणि उजव्या पायाला गंभीर दुःखापत होऊन रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यास तातडीने बारामती येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे. सुपे परिसरात स्वयंपाकाची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. कालच्या या अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलीस स्टेशनला उशीरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. 
         .......................................

To Top