Bhor News l 'राजगड'कडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ऊस बियाणे उपलब्ध : मा. आमदार संग्राम थोपटेंनी केला ऊस लागवडीचा शुभारंभ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर ऊस लागवडीसाठी बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.राजगड साखर कारखाना ऊस लागवड विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत भोरच्या वीसगाव खोऱ्यातील खानापूर( पोळवाडी )ता.भोर येथील शेतकरी जितेंद्र भरत पोळ,शिवाजी रामभाऊ थोपटे यांच्या शेताच्या बांधावर को ८६.०३२ या जातीचे ऊसाचे निकोप बियाणे उपलब्ध करून दिले.ऊस लागवड कार्यकर्माचा शुभारंभ कारखान्याची चेअरमन, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी शेतकऱ्यांच्या समवेत केला.
   माजी आमदार थोपटे म्हणाले कारखान्याचा पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरित्या सुरू करण्यात येणार असून त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात ऊस लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याचे आवाहन केल्याप्रमाणे ऊसाचे बियाणे राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर उपलब्ध करून देत आहोत.त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने ऊसासाठी लागणारी खतेही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देणार आहे.यावेळी  राजगडचे व्हा.चेअरमन पोपट सुके, संचालक उत्तमराव थोपटे, सुभाषराव कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर,अनिल सावले,अतुल किंद्रे, अमर बुदगुडे, संदीप नांगरे,मधुकर कानडे,किसन पोळ,राजेंद्र शेटे, पोपट मालुसरे,बापू जेधे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
To Top