सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावळी तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या विचारांची देवाण घेवाण होणाच्या दृष्टीने आणि होऊ घातलेल्या नगरपंचायत व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांसंदर्भांत विचार विनिमय करण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा व भव्य नागरी सत्कार सोहळा पर्याटन खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे सह शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून मेळाव्यास भव्य संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे, शांताराम पार्टे, मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे यांनी केले आहे.
मेढा ता. जावली येथिल कलश मंगल कार्यालया मध्ये सायंकाळी ४ वाजता शिवसेना ( शिंदे गट ) यांचा आगामी होत असलेल्या मेढा नगरपंचायत व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांसंदर्भांत भव्य असा मेळावा होत असून अंकुश कदम यांची शिवसेना संपर्क प्रमुख नवी मुंबई पदी नियुक्ती झाले बद्यल भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे, शांताराम पार्टे, मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे यांनी माहिती दिली.
तसेच या शिवसेना मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा अध्यक्ष रणजित भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार
यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे, शांताराम पार्टे, मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे यांनी केले आहे.
