सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यास जोडणारा मुख्य रस्ता चेलाडी ते वेल्हे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करा अन्यथा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वेल्हे भाजपकडून देण्यात आला आहे. या संबंधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले असल्याचे माहिती तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की पुणे शहराला जोडणारा चेलाडी ते वेल्हे रस्त्याची दुरावस्था झाली असून मार्गासनी येथे एका महिलेचा व एका युवकाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला असून वारंवार मागणी करून देखील या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशी मागणी भाजपकडून देण्यात आला आहे. या संबधीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाडे यांना देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष राजु रेणुसे,उपाध्यक्ष विशाल वालगुडे,
कोषाध्यक्ष सचिन बधे,
कामगार आघाडीचे अध्यक्ष राजकुमार अलगुडे,युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश पवार,
शिरकोली सरपंच अमोल पडवळ,
वांगणी उपसरपंच शिवाजी चोरघे,
खांबवडी उपसरपंच दत्तात्रय गायकवाड,
सागर रेणुसे संदीप वालगुडे, अविनाश उफाळे, संपत शिंदे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.