बारामती l सुप्यातील शेतकरी कृती समिती कडुन पुरग्रस्तांना मदत : माढा तालुक्यातील सुलतानपूर व तांदूळवाडीत ३५० किटचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे परगण्यातील शेतकरी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सिना नदी काठावरील पूरग्रस्त असलेल्या तांदूळवाडी व सुलतानपूर या दोन गावांमध्ये सुमारे ३०२ संसारोपयोगी वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
          एक हात मदतीचा मागत असताना सुपे आणि परगण्यातील वाड्या वस्त्यांमधील शेतकरी कुटुंबांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी ५० किलोचे संसारोपयोगी ३५० किट देण्यात आले. शेतकरी कृती समितीने तिन महिंद्रा पिकअप भरून लागणारे धान्य घेऊन गेले होते. सुपेकरांनी ही मदत सामाजिक ऋणाची बांधीलकी जपत केली आहे. 
       यावेळी कृती समितीतील तरुणांनी तीन दिवस पॅकिंग करून करून बाजरी, दळलेले गव्हाचे पिठ, चहा पावडर, साखर, तेल, साबण, मसाले, पांघरूण रझई अन्य साहित्यांचे वाटप केले.  
     माढा तालुक्यातील तांदुळवाडी व सुलतानपूर या गावात पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यात सुलतानपूर या गावात २०० कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबाना पुराचा मोठा फटका बसला. या गावात सर्वांना संसारोपयोगी किटचे वाटप करण्यात आले. तर तांदूळवाडीत १५० किटचे वाटप केल्याची माहिती कृती समितीच्यावतीने देण्यात आली. यावेळी तांदुळवाडीचे समाजसेवक सुमंत गवळी यांचे सहकार्य मिळाले. तसेच या गावातील लोकांनी केलेल्या मदतीचे उस्फुर्तपणे कौतुक केले. जिरायती भागातील लोकांनी संकटकाळी मदत केल्याने अक्षरशः काही कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
            ............................
To Top