सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने सुपे येथील मुख्य पेठेतून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढून १८ हजार ६३० रुपयांचा निधी संकलीत करण्यात आला. यावेळी जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्त करण्यात आली.
या उपक्रमात श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक व विद्यार्थी, संघाचे सुमारे ५० सदस्य तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. तसेच यावेळी येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक बबन बोरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुपे पोलीस स्टेशनचे सपोनी मनोजकुमार नवसारे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक नितीन हाटे, येथील सरपंच तुषार हिरवे, बाजार समितीचे संचालक अरुण सकट, शौकत कोतवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष पोपट चिपाडे, संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक बसाळे, सदस्य ज्ञानेश्वर कौले, ज्ञानदेव पवार आदीसह जेष्ठ नागरिक संघाचे ५० सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ, सूत्रसंचालन सूर्यकांत कुंभार केले. तर आभार सुरेश फडतरे यांनी मानले.
.........................................