सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
अडवली (ता. राजगड) तालुक्यातील अडीच हजार एकरावर ऊस उत्पादन करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले अडवली येथे राजगड सहकारी साखर कारखाना ऊस लागवड विकास कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे बोलत होते.
बोलताना ते पुढे म्हणाले की कारखान्याचा पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरीत्या सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात ऊस लागवड करण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याचे आवाहन केल्या प्रमाणे उसाचे बियाणे राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने उसासाठी लागणारी खतेही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देणार असल्याचे थोपटे यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी संचालिका शोभा जाधव, संदीप नागिने, व्हॉईस चेअरमन दिनकर धरपाळे, नाना राऊत भाजपा अध्यक्ष राजू रेणुसे, माजी सरपंच शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे, शिवराज शेंडकर ,आकाश वाडघरे गणेश जागडे शिवनाना कोंडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
