Rajgad l राजगड पंचायत समिती वर मनसेचा झेंडा फडकविणार : संतोष दसवडकर ! अस्कवडी येथे मनसेचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुका पंचायत समिती वर मनसेचा झेंडा फडकविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केले. अस्कवडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दसवडकर बोलत होते.
          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगड तालुका जन संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी दसवडकर बोलत होते बोलताना ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तालुक्यातील दोन नंबरचे मतदार घेणारा पक्ष आहे. तालुक्यातील सर्व पक्षात वातावरण विचलित झाले असून नेते व उमेदवार गोंधळलेले आहेत. कोणाकडे ठोस निर्णय  घेण्याची क्षमता नाही. तालुक्यातील जनतेला एकमेव पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असून आगामी निवडणुकीत राजगड पंचायत समिती वर मनसेचा झेंडा फडकविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केले.

यावेळी तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, मुळशी तालुका अध्यक्ष राजू टेमगिरे, जिल्हा सचिव सागर खंडागळे, माजी सरपंच अशोक चोरघे, विनायक लिम्हण, संदीप सरपाले, दत्तात्रय चोरघे, दत्तात्रय शेंडकर, सीए तानाजी चोरघे, राजू झांजे, राम लिम्हण, रविंद्र घाडगे, अमोल गायकवाड, संतोष चोरघे, मिथुन चोरघे, तानाजी चोरघे, अमीत दसवडकर, पै. संग्राम दसवडकर, विक्रम जगताप, काळुराम जगताप, आदीसह मनसेचे सैनिक उपस्थित होते.
To Top