Baramati Breaking l दंडवाडीतील पोल्टीफार्ममध्ये तयार केला जात होता गुटखा : पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील दंडवाडी अंतर्गत नगरे मळ्यानजीक असणाऱ्या एका पोल्ट्री शेडवरील खोलीत बेकायदेशीर गुटका उत्पादन करणाऱ्यावर सुपे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे सात लाख किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. 
       दिनेश कुमार देशराज ( वय ३८ वर्ष रा. थाना बंगरमउ, सिरधरपुर, उत्तर प्रदेश ), महेश नामदेव हिरवे ( वय 3५ वर्ष रा. सुपे ता. बारामती जि. पुणे ) या दोघांना अटक करून न्यालयीन कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे ( वय ४३ वर्षे ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 
         पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरवे यांच्या शेतातील पोल्ट्री शेडवर बेकायदेशीर गुटका उत्पादन करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुप्याचे सहायक पोलीस अधिकारी मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक जिनेश कोळी, रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत आदीच्या टीमने या ठिकाणी छापा टाकून मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात गुटका उत्पादन, साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर बंदी आहे. त्यामुळे मानवी आरोग्यास अपायकारक प्रतिबंधीत पदार्थाचे उलंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 
       यावेळी या छाप्यात गुटका मशीनसह तंबाखू, विमल, विमल पान मसाला, गुटखा पुडीचे पॅकिंग रोल, सुगंधी सुट्टी तंबाखु, सुगंधी सुपारी, केशरयुक्त विमल पान मसाला आदी सुमारे सात लाख सात हजारचा किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत. 
        ........................................
To Top